April 12, 2011

२५ मे –‘भंदक थाच

हा आमच्या सफरीतला शेवटचा कॅम्प होता. आम्ही हळूहळू पायथ्याशी वाटचाल करू लागलो होतो. आता चढ चढायचा नसल्याने मला जरा जड बॅग घेऊन उतरायला थोडस सोप पडत होत. आजचा प्रवास तसा जास्त होता, सुमारे ७-८ किमीचा होता. भंदक थाच’ कॅम्प ला युथ होस्टेल वाले भारताचे स्वित्झर्लंड म्हणतात, पण स्वित्झर्लंड पाहिलं नसल्याने मी तुलना करणार नाही. पण एवढ मात्र नक्की सांगू शकतो की इतर बाकी कॅम्प पेक्षा –‘भंदक थाच’ स्पॉट ला निसर्ग अफलातून होता. निसर्गाने भरभरून सौंदर्याचे दान या प्रदेशात टाकल होत. अतिशय विस्तीर्ण अस हिरवगार माळरान आणि वर आम्ही सर् करून आलेला साक्षात हिमालय होता. आम्ही जेव्हा प्रवासाची सुरुवात भून्तर पासून केली तेव्हा छान आल्हाददायक वातावरण होते त्यानंतरचे सर्वात सुंदर वातावरण तेव्हा त्या वेळी होते. कदाचित आता आपल्याला यापुढे चालाव लागणार नाही अजून या भावनेने अजूनच छान वाटत होत. नेहमी आम्ही कुठल्याही कॅम्प वर आलो की पहिले आडवे व्हायचो थोडावेळ, पण तिथे काहीतरी धावाव,खेळाव, धमाल मजा मस्ती करावी अस वाटत होत सर्वानांच. योगायोगाने त्या कॅम्प साईट वर आम्हाला एक कापडी चेंडू मिळाला. मग आम्ही अबधुबी किवा शेकाशेकी खेळायचं ठरवल. महाराष्ट्र विरुद्ध बाकी राज्ये अशी गटविभागणी झाली. गुजराती बांधवांना चेंडूने शेकवून शेकवून आम्ही पुरते बेजार केले. खूप दिवसांनी धावल्या-पडल्या मुळे बालपणीच्या त्या खेळाच्या आठवणी ताज्या झाल्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर छान खेळ झाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यात खेळता खेळता प्रसाद धडपडला आणि नेमका त्याच्या खिशातील त्याच्या मोबाईल वरच. त्याचा ७५ किलोचा देह (मी अंदाजेच सांगतोय, कमी जास्त किंबहुना जास्तच असाव)त्या मोबाईल वर पडला, हे लक्षात आल्यावर लगबगीने त्याने मोबाईल बाहेर काढला(एरवी माणूसही चेपला असता). सुदैवाने मोबाईल शाबूत होता(बघा नोकियाचे पीस किती धडधाकट असतात त्याचा अजून एक नमुना). मोबाईल काही चालू होईना, प्रसादच्या चेहऱ्यावर किंचितशी चिंता उमटली पण त्या निमित्ताने नवीन मिळेल हा विचार त्याला सुखावत होताच. पण मजा अशी झाली त्याच्या मोबाईलची battery संपल्याने तो बंद होता, जेव्हा चार्जिंग चालू केल तेव्हा व्यवस्थित चालू झाला(आणि तो अजूनही वापरतोय तो पीस). नेहमीप्रमाणे सूप वगेरे झालेच. आमचे नेते सोमणकाका यांनी सर्वांना बोलावले आणि त्यांचे Contact details एका कागदावर लिहून द्यायला सांगितले आणि ते गोळा करायची जवाबदारी मी आणि प्रसादने उचलली. त्याचबरोबर ह्या ट्रेक मध्ये जमलेली सर्वांची मैत्री अशीच कायम राहावी आणि पुढेही सार्वजन एकमेकांच्या संपर्कात राहावे यासाठी ओर्कुट आणि फेसबुकवर ‘रंगीन पांडा २०१०’ अशी Community काढायची ठरले आणि ती जवाबदारी अविनाशने उचलली. मग जेवणाचा कार्यक्रम ठरला आणि त्या दिवशीची कॅम्प फायर जोरदार करायचे ठरले. साधारण ९ वाजता कार्यक्रम चालू झाला. तिकडे प्रकाशासाठी आम्ही एक कल्पना काढली, लाकडे न जळवता आम्ही सर्वांच्या Torches गोळा केल्या आणि डिस्को लाईट प्रमाणे त्या अरेंज करून छान पैकी वातावरणनिर्मिती केली. त्या दिवशी प्रत्येकाने almost काहीना काहीतरी कला सदर केली. सुरुवातीला कोळीनृत्य, गरबा मग सोनूच्या ग्रुपचे आधुनिक रामायणाचे नाटक, दीपाचे नृत्य,दक्षिण भारतीय मंडळीचे folk गायन, दोन्ही मांचे सुंदर आवाजातील गायन असा कार्यक्रम रंगत होता. मग लोकाग्रहास्तव मी ब्रेथलेस गाण परत एकदा सादर केल त्यादिवशी. त्या कॅम्प फायरला खुपच धमाल आली. ती रात्र कधीच संपू नये अस प्रत्येकाला मनोमन वाटत होत. पण वेळेच्या आणि जागेच्या मर्यादा पाळण तितकच महत्वाच होत. नेहमीप्रमाणे Bournvita पिऊन आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो

2 comments:

Aditya Neela Dilip Nimkar said...
This comment has been removed by the author.
Aditya Neela Dilip Nimkar said...

मस्त... मजा आली वाचून.तुम्ही भंडक थाच वरून पुन्हा कसोल ला आला असाल ना! तिथून मुंबईला आलात परत की इतरत्रही फिरलात? कारण, मी पुढे उत्तर हिंदूस्थान बघायचा असं ठरवून भरपूर फिरलो हेतो. (That time I was damn impressed by Amritsar.U can read my article regarding this on my Blogspot)पण, खरोखर सारपासचा अनुभव हा lifetime Experience आहे. एवढं नक्की. बाकी,फेसबुकवर रंगीन पांडा २०१० ओपन केलेली आहे का?