एका देशस्थ ब्राह्मणाच पुत्ररत्न(तुम्ही कारट म्हणा हव तर).कट्टर मराठी भाषाभिमान अगदी सुरेश भटांच्या भाषेत सांगायचे तर 'लाभले आम्हास भाग्य..'. आमचे कुळ हे पुण्याचे असल्याने पुण्याच्या मातीतले(हवे नको ते) सगळे गुण भरभरून आहेत(कुचकट, खत्रूड,खवट). ह्या ब्लॉग वर जे काही लिखाण होईल ते उस्फुर्त आणि रोकठोक असेल.त्यात गरजेनुसार कुचकट टोमणे, काही व्यक्तींचे एकेरी उल्लेख, आक्रमक भाषा असेलच, पण त्याच बरोबर वाचनीय साहित्याचा(स्वताच्या आणि दुसऱ्यांच्यापण. टीप- लिखाणाचे श्रेय वेळेवर त्या त्या व्यक्तीस दिले जाईलच ). त्यामुळे ज्यांना आवडला त्यांनी आवडून घ्या आणि प्रतिक्रिया जरूर द्या. ज्यांना नाही आवडला त्यांना टीका करायलाही मी नाही म्हणत नाही(संविधानाने विचारस्वातंत्र्य दिलंय, त्यामुळे मी काही रोखू शकत नाही टीकेला).