July 18, 2008

अजुन एक सुंदर कविता

फक्त्त एकदाच....तुझ्या डोळ्यात बघाचय

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
आपल्या दोघांची तीपहीलीच भेट.
तु केसात माळलेल्या
गुलाबाच्या फुलाच ते देठ


आपल्या दोघांच ते
तासन तास गप्पा मारण...
विषय संपलेला असतांनाही
त्याच्यावरतीच ते कीस पाडण...


मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
तु पाडव्याला नेसलेली
ती नऊवारी साडी॥
तिथेच तु तुझ्या खिडकीत,
ऊभारलेली ती साखरेची गुढी


तुझ्या-माझ्यात झालेल
ते पहीलच भांडण...
तुझा राग जाण्यासाठी तुझ्या हाताच
मी घेतलेल ते वरवरच चुंबन...


मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
चेह-यावरच तुझ ते
अलगद लाजुन हसण
आणि लाजता लाजताच

हळुचते माझ्याकडे बघण....

आपली शेवटची ती संध्याकाळ...
आपण दोघोच होतो फ़क्त
आणि पुढे तो भयंकर काळ...


कांचाचा ढीग, रक्त्ताचा सडा,
तुझी शेवटची आरोळी...
संपलच सगळ एका क्षणार्धात...
मी मात्र वाचलो त्या अपघातात,
तुला मात्र दोन महीने झाले आता
तशीच निपचित पडुन आहेस तु आयसीयुतल्या त्या खाटेवरती...

म्हणुनच... ऎक ग..
तु जरा माझ..ऊघडशील ना.....
तु तुझे डोळे?? कारण....
एकदाच....मला फक्त्त एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...

1 chan kavita

सगळीच गणितं चुकली आहेत......
आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,
आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहे
माहीत आहे की तु येणार नाहीस,
तरीसुध्दा वेडे मन हे तुझ्याच वाटेला डोळे लाऊन बसले आहे

पहाटेचा उत्साह आता राहीला नाही,
संध्याकाळ म्हणावी तशी रम्य होत नाही
सगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतयं
कळत असुनही मन पुन्हा पुन्हा तिकडेच धावतयं

सकाळची गुलाबी थंडी, संध्याकाळची सोनेरी किरणे,
पक्षांची किलबिल आणि पावसातला गारवा
सगळं काही कुठेतरी हरवलं आहे,
निर्सगही जणु माझ्याबरोबर तिलाच शोधत आहे

माझे कुठं चुकले आता काहीच कळत नाही,
अनुत्तरीत प्रश्नाची उत्तरं शोधुनही सापडत नाहीत
म्हणुन पुन्हा नव्याने सगळी गणितं तपासत आहे ,
पण छे आता सगळीच गणितं चुकली आहेत....