June 20, 2008
पुणेरी चपराक
काही वेळेला "खोडी" काढायचं मनात नसतं. पण ग्राहकानं अनाठायी शंका विचारुन बेजार केलं तर "इरसाल पुणेरीउत्तराची" चपराक बसते. उदा. शिट्टीवर सुरेल गाणं सादर करणारा मित्रवर्य अप्पा कुलकर्णी मुळात महाराष्ट्र बँकेत होता. त्याच्या बँकेसमोरचा रस्ता फक्त ओलांडायचा अवकाश, समोरच आणखी एक सहकारी बँक होती. तिथलाच "चेक" घेऊन आपल्यामहाराष्ट्र बँकेतल्या खात्यात भरण्यासाठी ग्राहक महाशय आले. नेमकं काउंटरवरच्या अप्पाला त्यांनी विचारलं. "कॅश कधी होईल?"अप्पा म्हणाला, "उद्या बँकेला सुट्टी आहे, परवा होईल."ग्राहाकानं विचारलं, "का पण? समोरच्या बँकेचा तर चेक आहे. वेळ लागतोच कसा?""अहो. उद्या सुट्टी आहे...".. अप्पाचा नम्रपणा अद्याप सुटला नव्हता!"पण समोरच तर बँक आहे...." ग्राहक हेका सोडेना.मग खट्याळ अप्पाला राहवेना. तो म्हणाला, "काका, काय आहे, केवळ रस्ता ओलांडल्यावरच्याबँकेचा चेक आहे म्हणुन लगेचच कॅश होतो असं नसतं. प्रोसिजर असते... असं बघा.""काही सांगु नका, प्रोसिजर - बिसिजर!""ऐका तर काका... वैकुंठ, स्मशानभुमीच्या दारातच.. समजा तुम्ही गेलात म्हणजे मेलात तर दारातच गेले म्हणुन सरणावर चढवतील का? आधी ससुनला नेतील...चेक करतील.. घरी नेतील.. हार घालतील.. म्रुत्यु पास काढतील.. मग वैकुंठ कडे..!!""कळलं..!" फणकारत ग्राहक महाशय निघुन गेले।अशा इरसाल प्रश्नोत्तरामुळे किंवा "न" विचारता केलेल्या - नोंदविलेल्या प्रक्रियेमुळेच पुण्याचा जिवंतपणा टिकुन आहे... पूणं कधी 'डल' होत नाही..!... मेल फौरवर्ड : आभार - दशरथ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment